गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिक्स भाज्या स्वस्त...

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात प्रशासनाकडून वितरित करण्यात आलेल्या टपाली मतपत्रिकांच्या आकडेवारीनुसार २९ प्रभागांतून २२२८ पोस्टल मतदान अर्ज प्राप्त झाले असून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय ४ मधून सर्वाधिक ४०८ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

निवडणूक कामासाठी ६ हजार ३८५ शासकीय कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोस्टल मतदान प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जात असून, मतदानाची गोपनीयता आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचार्‍यांपैकी आतापर्यंत २९ प्रभागांतून २२२८ पोस्टल मतदान अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सर्वाधिक झोन क्रमांक ४ मधून ४०८ पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. त्या खालोखाल झोन ८ मधून ३३०, तर झोन १ मधून ३१४ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यात झोन २ मधून १४१, तर झोन ६ मधून १४३ अर्ज प्राप्त झाले आहेत.